| १०२४ |
गोंक या शिलाहार राजाच्या ताब्यात ' मिरिच' (मिरज) व ' करहाटक' (कराड) व दक्षिण कोंकण हा प्रांत होता. यातच सांगलीचा भूभाग समाविष्ट होता. |
| १२०५ |
शिलाहार राजा गंगादित्य याने मिरज भागांत इसकुडी येथे तलाव बांधला. कोल्हापूर, मिरज, शेडबाळ व तेरदाळ येथे याबाबतचे शिलालेख आहेत. |
१२५० - १३१८
|
देवगिरीच्या यादव राजानी या भागावर राज्य केले त्यावेळी ' मिरिच' प्रांतात तीन हजार गांवे होती. |
१३१९ - १३४७
|
दिल्लीच्या खिलजी व तुघलकानी या भागावर राज्य केले. |
१३४८ - १४८९
|
बहामनी सुलतानानी या भागावर राज्य केले. |
१४९० - १६५९
|
विजापूरच्या अदिलशहाने या भागावर राज्य केले. यावेळी मिरज प्रांत रायबाग महालात होता. |
| १६५९ |
छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती नेताजी पालकर याने हा भाग जिंकून घेतला. परत अदिलशहाने हा भाग जिंकून घेतला. |
| १६७२ |
पन्हाळयापासून मिरजे पर्यंतचा सर्व भाग शिवाजी महाराजांनी जिंकला. या नंतर मुसलमान सरदार विजापुरास निघून गेले. तेव्हापासून या भागाची सरदारकी मिरजेचे सरदार कदम यांच्याकडे होती.
|
| १७३० |
बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी मिरजेचे सरदार इंद्रोजी कदम यांच्या पागेची फडणीशी गोविंद हरी पटवर्धन यांना दिली. |
| १७३६ |
सरदार इंद्रोजी कदम हे दिल्लीवरील मोहिमेत कामास आले. ते निपुत्रिक होते. पुणं मुक्कामी त्याची मोठी पागा होती. आजही या पागेला `हुजूर पागा' असे नांव आहे. |
| १७४१ |
सरदार इंद्रोजी कदम यांच्या पागेची सरदारकी गोविंद हरी पटवर्धन यांना देण्यात आली.
|
१७६१ |
माधवराव पेशवे यांनी गोविंद हरी पटवर्धन यांना फौजेच्या खर्चाकरिता मिरजेचा कि ल्ला व आसपासची कांही ठाणी दिली. |
| १७६४ |
गोविंद हरी पटवर्धन व त्यांचे पुतणे परशुराम रामचंद्र व निळकंठ त्रिंबक यांचे नांवे आठ हजार स्वार ठेवण्याकरिता २५ लक्ष मुलुखाचा बहडा करुन दिला.
|
| १७६८ |
गोविंद हरी यांनी आपल्या वडिलंच्या स्मारकाकरिता सांगलीची सहाशे बिघे जमीन स्वतंत्र काढून हरीपूर हे गांव वसविले व ते गांव शंभर ब्राह्मणांना अग्न्हार दिले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी हे गांव बसविण्यास मंजुरी दिली. यानंतर हरीपूर हे क्षेत्र झाले. या टुमदार गावाची त्यावेळची लोकसंख्या दोन हजार होती व सांगलीची लोकसंख्या मात्र एक हजार होती. यावेळी हरीपूर हे सांगलीपेक्षा मोठे होते. |
| १७७१ |
मिरज मुक्कामी गोविंद हरी पुत्रशोकाने निधन पावले. |
| १७७३ |
वामनराव गोविंद पटवर्धन यांच्या नांवे मिरज प्रांताचा बेहडा झाला. |
| १७७६ |
वामनराव गोविंद पटवर्धन खानदेशात स्वारीवर असताना वरणगांव मुक्कामी निधन पावले. यांना पुत्र संतान नव्हते. म्हणून पांडुरंग गाविंद पटवर्धन यांना जहागिरीचा अधिकार मिळाला. |
| १७७७ |
हैदरवर स्वारी करण्यास गेले असता पराभव पावले. हैदरने त्यांना अटक केली. अटकेतच ते नवज्वर होऊन निधन पावले. |
| १७७९ |
हरिहर पांडुरंग पटवर्धन यांना सरदारकीची वस्त्रे मिळाली.
|
| १७८२ |
हरिहर पांडुरंग यांचा ज्वराने मृत्यू झाला. ते निपुत्रिक होते. |
| १७८३ |
हरिहर पांडुरंग यांचे बंधु चिंतामणराव आप्पासाहेब यांना मिरजेच्या सरदारकीची वस्त्रे मिळाली तेव्हा त्याचे वय आठ वर्षाचे होते. म्हणून त्याचे चुलते गंगाधरपंत काम पहात होते.
|
| १७८६ |
नाना फडणीस मिरजेस आले होते. |
| १७९५ |
निजाम व पेशवे यांच्या खडर्याच्या लढाईत पटवर्धन यानी शौर्य गाजविले म्हणून चिंतामणराव आप्पासाहेब यांचे नावे २५ हजार ५२१ रुपयांचा नवा सरंजाम बेहडा पेशव्यांनी करुन दिला. |
| १७९९ |
दुसरे बाजीराव पेशवे यांनी मिरज जहागिरीच्या वाटण्या करण्यास परवानगी दिली.

|