नाट्याचार्य देवल -
सन १८८० च्या सुमारास मराठी रंगभूमीवर मराठी रंगमूमीवर आणखी एक महत्वाची क्रांती झाली. आण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतलाने मराठी संगीत नाटकाचा पाया घातला. त्यांचेच शिष्य गोविंद बल्लाळ देवल या कृष्णाकाठच्या सुपुत्राने मराठी रंगमूमीवर नवीन नवीन लेणी चढविण्यास सुरवात केली. देवलांचे नाट्य संगीत म्हणजे तर सहज सुलभ सोप्या अशा प्रासादिक काव्यांचा नमुनाच होता. त्यांचं `संशय कल्लोळ' हे नाटक आजसुध्दा मराठी मनाला मोहिनी घालीत आहे. देवलांचे `शारदा' नाटक म्हणजे खर्या अर्थाने पहिले सामाजिक नाटक. सांगली हरीपूरच्या परिसरात घडलेल्या सत्य कथेचा धागा उचलून देवलांनी मराठी रंगभूमीवर आपली `शारदा' अजरामर केली. `मृच्छकटिक', `शापसंभ्रम', `दुर्गा', `झुंझारराव' या नाटकांनी मराठी रंगभूमीला बाळसे चढविले. सांगलीच्या मातीने मराठी रंगभूमीला दिलेली आणखी एक देणगी म्हणजे दिग्दर्शकाचे आद्यपीठ होय. खर्या अर्थाने गोविंद बल्लाळ देवल हे मराठी रंगभूमीचे पहिले दिग्दर्शक - तालीम मास्तर होत.
नाट्याचार्य खाडिलकर -
मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजविला सांगलीच्या आणखी एका महान तपस्वी नाटककाराने लोकमान्य टिळकांचा पट्ट शिष्य, प्रखर देशाभिमानी, भारतीय संस्कृतीवर, महाभारतावर आणि विशेषत: भवभूतीवर प्रेम करणारे आणि शेक्सपियर पचविणारे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या सांगलीच्या थोर नाटककाराने मराठी रंगभूमीवर क्रांती केली. स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या `कीचकवध' नाटकावर इंग्रज सरकारने बंदी घातली होती. या ज्वलंत प्रतिमेच्या `कीचकवध', `सवाई माधवरावांचा मृत्यू' या सारखी अनेक उत्तमोत्तम गद्य नाटके लिहिली. पांच गद्य नाटकांनी वश करुन घेतलेल्या रंगभूमीला या कवी कृष्णाने संगीत रंगभूमीचे अलौकिक लेणे चढविले. `विद्याहरण', `मानापमान', `द्रौपदी', `सावित्री' आदी संगीत नाटकाचा कोहिनूर असे ज्याचे वर्णन करता येईल असा `स्वयंवर' नाटकाने मराठी रसिक मनाला श्रीकृष्णाच्या मुरलीप्रेमाणे गुंगवून सोडले. म्हणूनच टीकाकार खाडिलकरांच्या काळाला मराठी रंगभूमीचे `सुवर्णयुग' म्हणतात. सांगलीच्या या नाट्याचार्याने मराठी रंगभूमीचा हा वृक्ष सुवर्ण पुष्पाबरोबरच अभिजात संगीताने सुगंधित करुन सोडला. १९४१ सालच्या शताब्दी महोत्सवाच्या वेळी ` आधि मी नाटक्या मग पत्रकार' असा थोर संदेश देऊन मराठी रंगभूमीला ऋणी केले.
असंख्य रत्ने
या थोर नाट्य महर्षीचे बरोबरच गडकर्यांचे नरहर गणेश कमतनूरकर हे सांगलीचेच `श्री', `सज्जन', `स्त्री पुरुष' या नाटकांमुळे त्यांनी रंगभूमी गाजविली. नाट्याचार्य खाडिलकरांच्या प्रमाणेच नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद यांनी भूषविले होते. याचबरोबर सांगली मध्ये आणखी नावे घेण्याजोगी नाटककार मंडळी म्हणजे पुष्कळ आहेत.
कै. गणपतराव गोडबोले वकील मोठ्या मभिमानाने म्हणत असत की सांगलीतल्या प्रत्येक व्यक्तीला आपण एखादे नाटक लिहावे असे वाटत असते. त्याप्रमाणे गोडबोल्यांनी अर्धवट नाटक लिहून सोडलेही होते. छापखाने वकील, भावे इंजिनियर या मागील पिढीतील लोकांनी नाटककार म्हणून नांव मिळविलेच. महाराष्ट्र शासनाने हौशी लोकांच्या नाट्य स्पर्धा सुरु केल्या आणि भावे नाट्यमंदिरातून यशवंत केळकर, मधुसूदन करमरकर, अरुण नाईक आणि दिलीप परदेशी, डॉ. मधु आपटे सारखे नवे नवे नाटककार उदयाला आले.
सन १८८० च्या सुमारास मराठी रंगभूमीवर आणखी एक महत्वाची क्रांती झाली. आण्णासाहेब किर्लोस्कराच्या शाकुंतलाने मराठी संगीत नाटकाचा पाया घातला. त्याचेच शिष्य गोविंद बल्लाळ देवल या कृष्णाकाठच्या सुपुत्राने मराठी रंगभूमीवर नवीन नवीन लेणी चढविण्यास सुरवात केली. देवलांचे नाट्य संगीत म्हणजे तर सहज सुलभ सोप्या अशा प्रासादिक काव्यांचा नमूनाच होता. त्याच `संशय कल्लोळ' हे नाटक आजसुध्दा मराठी मनाला मोहिनी घालीत आहे. देवलांचे `शारदा' नाटक म्हणजे खर्या अर्थाने पहिले सामाजिक नाटक सांगली हरिपूरच्या परिसरात घडलेल्या सत्य कथेचा धागा उचलून देवलांनी मराठी रंगभूमीवर आपली `शारदा' अजरामर केली. `मृच्छकटीक', `शापसंभ्रण', `दुर्गा', `झुंझारराव' या नाटकांनी मराठी रंगभूमीला बाळसे चढविले. सांगलीच्या मातीने मराठी रंगभूमीला दिलेली आणखी एक देणगी म्हणजे दि १/२ दर्शकाचे आद्यपीठ होय खर्या अर्थाने गोविंद बल्लाळ देवल हे मराठी रंगभूमीचे पहिले दि १/२ दर्शक - तालीम मास्तर होत.