कृष्णा नदीला दरवर्षी पूर येतो आणि कांही प्रमाणात नदी स्वच्छ होण्याच्या दृष्टीने पूर यावयास पाहिजे. तथापि २००५-२००६ सालापासून सांगली शहर व परिसरासाठी पुराचे हे स्वरूप बदलले आहे. पावसाचे प्रमाण थोडे फार वाढले तरी पुराचे पाणी नागरी भागात शिरण्याचे प्रमाण तसेच सुरक्षित पाणी पातळी ५४० मी. चे वर पुराचे पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. या पुराचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूरपातळी १० दिवसांपर्यंत टिकून राहते. इतके दिवस नागरी भागात पारी राहिल्याने इमारती धोकादायक बनतात. चीज वस्तूंचे नुकसान होते. जनावरे दगावतात, रोगराईर् पसरते व मानवी जीवनावर याचा विपरित परिणाम होतो. सांगली जिल्ह्यात २००५ सालीच्या पुरांत रू. ५१.२६ कोटी शासनातर्फे मदत म्हणून वाटले गेले तर सन २००६ मधील पूरपरिस्थितीमुळे रू. २९.०० कोटी मदत शासनातर्फे वाटली गेली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज प्रत्यक्ष वाटलेल्या मदतीपेक्षा कितीतरी जादा आहे.
कृष्णा नदीला कराडजवळ कोयना, सांगली ( हरिपूर)जवळ वारणा व नृसिंहवाडीजवळ पंचगंगा या मोठ्या नद्या मिळतात. त्यामळे सांगलीजवळ कृष्णा नदीला येणाऱ्या पाण्यामध्ये कोयना व कृष्णेच्या उपनद्या यांचे पाणी असते. तसेच हे येणारे पाणी साठविण्यासाठी कोयना, वारणा, धोम, बलकवडी ही मोठी धरणे तसेच अनेक मध्यम पाटबंधारे प्रकल्प व लघु पाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आले आहेत.
पावसाळयांत धरणाच्या सांडव्यातून सोडावयाच्या पाण्याच्या नियंत्रणाची सोय फक्त मोठ्या धरणाच्या सांडव्यावरील वक्रद्वाराद्वारेच केली जाते. अर्थात् त्याकिाणी विसर्गही मोठ्या प्रमाणात असतो. धरणांच्या सांडव्यातून येणारे पाणी आणि धरणांपासून सांगलीपर्यंतच्या पाणूलोटक्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे पाणी असे एकत्रित सांगली परिसरात येते व पूर येतो. मध्यम प्रकल्प व लघुपाटबंधारे प्रकल्प यांचा पावसाळयातील विसर्ग तसा पुराच्या दृष्टीने कमी असल्याने त्याचा म्हणावा तसा परिणाम जाणवत नाही.
सांगली जिल्वातून पुढे गेल्यानंतर नृसिंहवाडीजवळ पंचगंगा नदी कृष्णा नदीला मिळते. कृष्णा नदीला पूर असेल आणि त्याचवेळी पंचगंगेला पूर असेल तर पुराची तीव्रता वाढते. पंचगंगा कृष्णा नदीला जवळजवळ काटकोनांत मिळते. त्यामुळे कृष्णा नदीला फुगवटा येतो. आणि त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्याला बसतो. नृसिंहवाडीहून पुढे कृष्णा नदी म्हैसाल व नंतर राजापूर बंधारा व पुढे ती कर्नाटकात जाते.
कर्नाटकांत हिप्परगी बराज ( छोटा बंधारा) व नंतर अलमट्टी धरण आहे. अलमट्टी धरण पूर्ण झाल्यापासून म्हणजे २००५ पासून तेथे ५१९.०० मी. या पातळीला पाणीसाठा करणेस सुरुवात झाली आहे.. हिप्परगीबराजमध्ये ५२४ मी. या पातळीपर्यंत पाणी साठवले जाते.अलमट्टी धरण ते हिप्परगी बंधारा हे अंतर नदी प्रवाहाने १२५ कि. मी. आहे.
अलमट्टी येथे ५१९.६० मी. पातळी असेल तर पाण्याचा विसर्ग चालू ठेवण्यासाठी नदीची वळणावळणाची १२५ कि. मी.लांबी व पुरामुळे पसरट झालेले पात्र गृहीत धरून हिप्परगी येथे ५२४ मी. पेक्षा जास्त पातळी आवश्यक आहे. शिवाय
या प्रवाहाला मधे मधे असणारे बंधारे अडथळा करतात. हिप्परगी ते सांगलीचा आयर्विन ब्रिज हे अंतर १४० कि. मी. आहे. यानंतर उलट्या दिशेने हिप्परगीनंतर महाराष्ट्ृात राजापूर बंधारा, म्हैसाळ बंधारा, नरसोबावाडी (पंचगंगा संगम) ते अंकली पूल (सांगली-कोल्हापूर रस्ता) ते हरिपूर (वारणा संगम) ते सांगली अशी ठिकाणे येतात. अंकली पुलाजवळ नदीतळ पातळी ५२४ मी. आहे. पुराचे पाणी वहात असताना असे आढळून आले की अलमट्टी येथे पाणी पातळी ५१७.६० मी. असेल तर राजापूर येथे ५१५.०३ मी. व सांगली येथे ५४२.६३ पातळी होती व सांगली पुलाखालून १,७५,००० क्युसेक्स विसर्ग चालू होता. याचाच अर्थ असा की मोठा पूर असेल तर हे पाणी वाहते ठेवण्यासाठी पाणी स्वत: २५ मीटरचा फुगवटा (फरक) निर्माण करते. त्यामुळे साधारण प्रवाह चालू मसला तरी जर अलमट्टीला असलेल्या तलांकापेक्षा सांगलीतील तलांक बराच जास्त असणार. जर अलमट्टीला ५२३ मी. तलाक असेल आणि पाणी वाहते असेल तर पाण्याचा विसर्ग जसा असेल त्याप्रमारे सांगलीतील पाण्याची पातळी वाढेल.
२००४ पूर्वी राजाराम बंधाऱ्यातून कर्नाटकात पाणी सोडावे यासाठी आंदोलने, पोलिस बंदोबस्त यांची जरूरी होती. पण नंतर मेत्र ही आंदोलने बंद झाली कारण अलमट्टी आणि हिप्परगी धरणामुळे आलेल्या बॅकवाटरमुळे याची गरज संपली.
राजापूर बंधारा मार्च २००७ मध्ये सुद्धा पूर्ण भरलेला राहिला आणि ५२४ मी. पेक्षा जास्त पाणी पातळीमुळे बुडलेला राहिला.
१) त्यामुळे दर वर्षी पूर आला की प्रथम अलमट्टी धरण ५०९.२० मीटर पातळीपर्यंत भरेल व गेट टाकल्यावर पाणी मागे गरत गरत यअईल व पाणी पातळी वाढत जाईल.अलमट्टी धररापासून नदीमार्गाने अंकली पुलापर्यंतचे अंतर अंदाजे २०० कि. मी. इतके आहे. यानंतर येणाऱ्या पुराच्या पाण्याला इतक्या अंतरावर विसर्ग निर्माण करण्यासाठीआपोआपच पाणीपातळी वाढेल.
२) इतक्या अंतरावर म्हणजे अलमट्टी धरण ते अंकली पूल २०० त्रक. मी. खाली जे पाणी असेल ते स्थिर असल्याने त्याठिकाणी पुरामुळे वाहून आलेला गाळ साठणेससुरुवात होईल. नदीचे पात्र उथळ होईल व पुराची तीव्रता व पसारा वाढेल.
३) धरणामध्ये साधारणपणे ७० ते १०० वर्षांत गाळ पूर्ण भरेल असे अपेक्षित असते. म्हणजेच सांगलीच्या खाली असलेल्या धरणाच्या गाळामुळे पूर पातळी वाढण्यातगाळाचा सहभाग असेल व परिणामी सांगलीला दर वर्षी धोका निर्माण होईल.
साधारणपणे २० ते २५ वर्षांतर याचे जाचक परिणाम जाणवतील आणि धरणाच्या मागील पाणीसाठ्यांत (बॅक वॉटर) असलेले सांगली हे एकमेव ऐतहासिक मोठे शहर असेल.
४) गाळाच्या वाढीने पात्र उथळ होते आणि त्यानंतर नदीचे पात्र दिशा बदलण्यास सुरुवात करते. उत्तर भारतातील गंगा नदी व आसाममधील ब्रह्मपुत्रा नदी ही उदाहरणेआपल्यासमोर आहेत.यावर काय करता येईल ?
१) कृष्णा खोऱ्याचा जलशास्त्रीय दृष्टीने परत एकदा अभ्यास करावा लागेल. धरणे बांधली त्यावेळी हा झाला असेल पण त्यानंतर नदी, उपनद्या व नाल्यांच्या क्षेत्रांत रस्ते,पूल, बंधारे, बांधकाम, काही ठिकारी नाले बुजवणे, अशा बऱ्याच प्रकारे पाण्याच्या मुक्त प्रवाहाला अडथळे येतात आणि पाण्याची पातळी प्रवाहित होण्यासाठी वाढते. फुगवटा येतो.या अभ्यासाने अडथळे आणि पुराचे वेळी खोऱ्यातील निरनिराळया ठिकाणची पाणीपातळी व विसर्ग कळू शकेल आणि याचा पूरनियंत्रणासाठी उपयोग होऊ शकेल.
२) कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा व इतर उपनद्या, ज्यांचे पाणी कृष्णा नदीत येते. त्यांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये स्वयंचलित व योग्य त्या वेळेच्या अंतराने पाऊस कितीपडतो, केंव्हा सुरू झाला, थांबला याची माहिती पूर नियंत्रण कक्षाला उपग्रहावरील दूरस्थ संदेश यंत्रणेमार्फत आपोआप मिळाली पाहिजे. या माहितीच्या आधारे किती पाऊस पडला,तेथून ते पाणी धरणात येण्यास किती वेळ लागेल, धररातील पाणीपातली किती वाढेल, तसेच धरराखालच्या क्षेत्रांत पडणारा पाऊस, नदीची वाढणारी पातळी, विसर्ग यांची माहितीहोऊ शकेल. या सर्व गोष्टींसांी संगरक व त्याची आज्ञाप्रणाली आपल्याकडे बनवणे फारसे अवघड नाही.यामुळे ज्याठिकाणी पूर-नियंत्रण दरवाजे आहेत. अशा धरणाच्या विसर्गावर अचूक नियंत्रण, नदीतील पाण्याची पातळी व परिणाम योग्यप्रकारे होऊ शकेल. नदीतील विसर्गावर वपर्यायाने पातळीवर नियंत्रण, तसेच येणारा पूर व त्याची पातळी हे सर्व बरेच अगोदर समजल्याने नागरिकांना अगोदरच सावधगिरीच्या सूचना देता येतील.धरणातील पाणी, विशेषत; कोयना धरणातील पाणी आणि त्यामुळे संगणकीय माहितीवरून कोणत्या धररातून किती विसर्ग सोडायचा, दरवाजे केव्हा व किती उघडायचे, यांचा
त्वरित निर्णय घेणे सक्षम अधिकारी / समिती यांचेद्वारे घेता येईल.
३) नदीत गाळ येऊन नदीचे पात्र उथळ बनेल व पुराची व्याप्ती वाढेल हे निश्चित आहे. याचा अभ्यास प्रतिकृती तयार करून वेळोवेळी गाळाने नदी किती भरते याचे निरीक्षणकरून मार्ग काढ्ता येईल. कारण धरणे आहेत, पाऊस आहे, पूर आहे, गाळ येणार, तो पात्रात भरला जाणार पण सांगली शहराचे काय होणार हा महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्नराजापूर बंधाऱ्यापासून पुढे कर्नाटकसाठीही असणारच आहे.
४) वरील सर्व योजना अंमलात आणण्यासाठी वेळ लागेल तोपर्यंत पाटबंधारे खात्याचे कर्मचारी जे पावसाळयांत निरनिराळया ठिकाणाहून पाूस, पाण्याची पातळी, पाण्याचेपरिमाण ही माहिती काही तासांच्या अंतराने प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन गोळा करतात व कळवतात. त्यांना निवडणुका किंवा आपद्कालात जशी वाहने पुरविली जातात तशीदिल्यास त्याचप्रमाणे मोबाईल फोन, चांगल्या टॉर्चेस, रेनकोट व अत्यावश्यक वस्तू अग्रक्रमाने उपलब्द करून दिल्यास त्यांचेकडून मिळणारी माहिती अचूक व त्वरित मिळू शकेल,व या माहितीवरून अधिकाऱ्यांना पूरनियंत्रणासाठीचा निर्णय घेणे सोपे होईल.
५) कृष्णा नदीवर ताकारी, म्हैसाळ, त्त्येंभू या उपसा सिंचन योजना आहेत. त्या जितक्या चालविता येतील तितक्या जूनपासून म्हणज नदीची पातळी वाढायला सुरुवातझाल्यापासून चालविल्या आणि जिल्हाधिकारी, सांगली यांच्या नदीजोड प्रकल्पांत दाखविल्याप्रमारे दुष्काळी भागांत, जिथे पाऊस उशीरा पडतो. तेथील तलाव भरले तर पाणी टंचाईदूर होईल व नदीची थोड्याफार प्रमाणांत पूर सामावून घेण्याची क्षमता वाढेल.
६) गेल्या दोन वर्षात शासनाने पूरग्रस्तांना मदत म्हणून रु. ८०.२० कोटी वाटले. प्रत्यक्ष आर्थिक नुकसान झाले, पुरास्थितीत उद्भवलेली रोगराई यांचा विचार केला तर वरीलउपायांना कमी खर्च येईल व कायमस्वरूपी पूर टाळणे आणि पाण्याचा सुयोग्य वापर करणे या दोन्ही गोष्टी साध्य होथील.
संकलन - श्री. सु. बि. कुलकर्णी, मा. ब. जाधव आणि डॉ. सु. वि. रानडे, महापूर अभ्यास समिती
निवृत्त अभियंता मंडळ, सांगली
|