| १८०१ |
सांगली हे राजधानीचे गांव झाले. म्हणजेच श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीस आले. गणेशदुर्गाच्या बांधकामास प्रारंभ केला. |
| १८०६ |
सांगलीच्या श्रीगणपती मंदिराची आखणी झाली. |
| १८०७ |
सांगलीच्या पेठांची आखणी व वसाहतीला प्रारंभ झाला. |
| १८०८ |
पटवर्धनांतील वाटण्या पूर्ण झाल्या व सांगली हे जहागिरीचे गांव निश्चित झाले.
|
| १८११ |
गणेशदुर्गाचे काम पूर्ण झाले. |
| १८१८ |
इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य घेतले व सर्व सरदारांना व जहागीरदारांना नोकरी करण्याचा हुकूम केला.
|
| १८२० |
'मी इंग्रजांची नोकरी करणार नाही' असे सांगून पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी १ लक्ष ३८ हजार ९९५ रुपयांचा मुलूख इंग्रजांस तोडून दिला. त्यात हुबळी, तडस, बरडोल, बामनगट्टे हे परगणे व गोपन गोपची सरदेशमुखी व शहापूर तालुका असा मुलुख दिला हा करार ईस्ट इंडिया कंपनीशी बेळगांव येथे झाला.
|
| १८२१ |
सांगली शिळा प्रेस छापखान्याची स्थापना. |
| १८३४ |
सांगलीत टांकसाळ सुरु करुन नाणी पाडण्यात येऊ लागली.
|
| १८३८ |
धुंडीराव चिंतामणराव पटवर्धन यांचा जन्म. |
| १८४२ |
दिवाणी व फौजदारी अधिकार असलेल्या न्यायाधिशांची सांगलीत नेमणूक झाली. पण यावेळी कायदेकानून अस्तित्वात नव्हते. जुन्या वहिवाटीवरुन न्यायदान होत असे.
|
| १८४३ |
विष्णुदास भावे यांनी सांगलीस मराठी रंगभूमीस प्रारंभ केला. |
| १८४४ |
चैत्र शुध्द दशमीला सांगलीच्या श्रीगणपतीची प्रतिष्ठापना केली. |
|
१८४६-१८५० |
मिरज मळा, गणपती मळा, तात्यासाहेब मळा, उपळावी व खरशिंग येथील आंब्याच्या बागा लावल्या. सांगलीत आमराई तयार केली. |
| १८५० |
हरीपूर हे गांव बुधगांवकर पटवर्धनांकडे गेले. |
| १८५१ |
मुन्सफ न्यायालये प्रथम स्थापन झाली. याच साली पहिले चिंतामणराव आप्पासाहेब हे सांगली मुक्कामी निधन पावले. |
| १८५३ |
कृष्णा नदीस महापूर आला. |
| १८५५ |
सांगलीत पहिला सरकारी दवाखाना निघाला. |
| १८६० |
मोठा दुष्काळ पडला. |
| १८६१ |
सांगलीत सार्वजनिक शिक्षणास प्रारंभ झाला. |
| १८६३ |
मराठी शाळा व वाचनालय याची सुरुवात. |
| १८६४ |
सांगली शहर सफाई कचेरी स्थापन. |
| १८६५ |
सांगलीत पहिली इंग्रजी शाळा व व्याकरण शाळा निघाली. |
| १८६५ |
वेदशास्त्र शाळेची स्थापना. या वेदशास्त्र विद्यालयात १) ऋग्वेद २) यजुर्वेद ३) न्याय ४) व्याकरण ५) ज्योतिष हे शिक्षण देणार्या ५ पाठशाळा काढण्यात आल्या. |
| १८६८ |
सांगली नगर वाचनालयाची स्थापना. |
| १८७२ |
सांगली शहराचा पहिला सिटी सर्व्हे झाला तसेच याच साली अपील कोर्ट नेमण्यात आले. |
| १८७६ |
अडमिनिस्ट्रेटर मेजर वेस्ट यांनी सांगली म्युनिसिपालिटी स्थापन केल्याचे जाहिर केले, याच सालात ट्रेझरी ऑफिसर नेमण्यात आला. यापूर्वी पथक फडणीस संस्थानचा हिशोब पहात होता.
|
| १८७७ |
मोठा दुष्काळ पडला. |
| १८७८ |
दुष्काळामुळे शाळा ओस पडल्या. |
| १८८४ |
गणेशदुर्गमध्ये दगडी कमान बांधली. |
| १८८७ |
लॉर्ड रीसाहेबांची सांगलीस भेट. |
| १८८७ |
पुणे मिरज रेल्वे फाटा आला. याच साली काकडवाडीहून 'सायफन' पध्दतीने सांगली शहरास स्वच्छ पाणी पुरवठा सुरु झाला. |
| १८८९ |
सांगली म्युनिसिपालिटीने आगीचा पहिला बंब खरेदी केला. |
| १८९१ |
सांगली शहराची लोकसंख्या तेरा हजार झाली याच साली मिरज - कोल्हापूर रेल्वे लाईन सुरु झाली व पोस्ट ऑफिस सुरु झाले. |
| १८९२ |
हायस्कूलला ड्राईंग क्लास जोडला. |
| १८९३ |
सांगली स्टेट बँक सुरु झाली. |
| १८९५ |
हायस्कूलला स्कूल फायनल क्लास जोडला. |
| १८९८ |
सांगलीत पहिली प्लेगची साथ आली. २ हजार १५९ माणसे मयत झाली.
 
|