मुख्य विभाग

स्वागतकक्ष आपली सांगली सांगली टेलीफोन
सांगली टेलीफोन पीडीएफ प्रिंट ई-मेल
सांगली संपन्न आणि समृद्ध महाराष्ट्नतील एक प्रगत शहर विभिन्न शैक्षणिक संस्थांचे आगर अनेक कवी आणि लेखकांचे जन्मस्थान आणि कर्मभुमी. जागरूक देवस्थानानी वेढलेलं, निसर्गसंपदेनं नटलेल,व्यापारात आघाडीवर असलेलं हे बहुश्रुत आणि सुसंस्कृत शहर महाराष्ट्नच्या नकाशात सहकाराच्या तेजोवलयासह मानाचे स्थान मिळवून चमकत आहे.या शहराच्या प्रगतीत सांगली दुरसंचाराचा वाटा बहुमुल्यच.संदेशवहनाची आवश्यकता तर मानवासाठी आदिम काळापासुन होती आणि आहे ती पूर्ण करण्यासाठी सांगली दूरसंचार निरंतर ग्राहक सेवेस कटिबद्ध आहे.
एका छोटयाशा पी.सी.ओ.च्या रूपाने सांगलीत दूरसंचार सेवेची सुरूवात झाली.गरज आणि उपलब्धतेनुसार प्रथम सी.बी.नॉन मल्टिपल एक्स्चेंज आणि नंतर ४०० लाईन्सचे सी.बी.मल्टिपल एक्स्चेंज सुरू झाले.ही क्षमता कालांतराने १२०० लाईन्स पर्यंत वाढली.सांगलीचे औद्योगिकीकरण झपाटयाने होऊ लागल्यामुळे औद्योगिक वसाहतीत नवीन सी.बी.मल्टिपल एक्स्चेंज सुरू झाली.या काळात सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पुणे दूरसंचारच्या आधिकाराखाली होता.डिव्हिजनल इंजिनिअर , पुणे हे प्रमुख अधिकारी होते.
सन १९६८ मध्ये कोल्हापूर विभाग स्वतंत्र रूपात कार्यान्वित झाला आणि सांगली जिल्हा कोल्हापूरच्या अधिपत्याखाली आला. सांगलीच्या प्रगतीबरोबर दूरध्वनीची मागणीही वाढत होती.१९७५ साली सांगली, आसपासची खेडी , जयसिंगपूर , इचलकरंजी , कराड असा संपूर्ण भाग मिळून सांगली जिल्हा दूरसंचार स्वतंत्र विभाग रूपाने आस्तित्वात आला.डिव्हिजनल इंजिनिअर टेलिग्राफ हे प्रमुख अधिकारी त्यावेळी काम पहात. २० मार्च १९७५ रोजी सांगलीमथ्ये सी.बी. मल्टिपल एक्स्चेंज बंद करून ३००० लाईन्सचे मॅक्स १ टाईप एक्स्चेंज सुरू करण्यात आले.यानंतर सांगली दूरसंचारच्या प्रगतीचा आलेख चढताच राहिला. २४ दूरध्वनी केंद्रे, ४३३५ लाईन्सची क्षमता, ३८१५ कार्यरत दूरध्वनी आणि २१६० प्रतीक्षायादी अशी परिस्थिती १९७५ मध्ये होती.
१९९५ मध्ये सांगली जिल्हा क्रमोन्नत होऊन ज्युनिअर अॅडमििस्ट्न्ेिटनव्ह स्तरावर आला. उपमहाप्रबंधक श्री.के.व्ही.सुब्बाराव यांनी कार्यभार स्वीकारला आणि दूरसंचारच्या आथुनिकीकरणानं वेग घेतला. १९९५ साली १०८ दूरध्वनी केंद्रे, ३००६० लाईन्सची क्षमता, २४५०९ कार्यरत दूरध्वनी अशी स्थिती होती. १९९७ साली दूरध्वनी केंद्रांची १३६, क्षमता ४८५७२ लाईन्स, कार्यरत दूरध्वनी ४४१०२ तर प्रतिक्षायादी ९६५८ होती. सांगलीच्या या वाढत्या प्रगतीमुळे जिल्हा सीनियर अॅडमििस्ट्न्ेिटनव्ह ग्रेड स्तरावर आला. मा. महाप्रबंधक म्हणून श्री.कृष्णकुमार यांनी सूत्रे हाती घेतली. त्यांच्या प्रोत्साहनाने आणि कार्यतत्परतेने सन २००० पर्यंत सांगलीने १ लाख दूरध्वनीचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. जिल्हयात बहुसंख्य ठिकाणी ओ.एफ.सी., पीसीएम, रेडीओ सिस्टीम आदि विश्वासार्ह माध्यमे उपलब्ध झाली. आजमितीस ३२८ दूरध्वनी केंद, १३६२३८ लाईन्सची क्षमता, १४९३३१ कार्यरत दूरध्वनी, १०१८५ प्रतीक्षासूची अशी सांगलीची उल्लेखनीय संख्यात्मक प्रगती आहे. १७७१ लोकल पीसीओ, १५०७ एस.टी.डी. पीसीओ, ७१० ग्रामपंचायत पीसीओ तसेच विकलांग, अंध आदींना यात प्राधान्य अशी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही सांगली दूरसंचारमध्ये आहे. ३१२३ इंटरनेट कनेक्शन्स, ८ इंटरनेट धाबे, २४ आयएसडीएन लाईन्स अशा अत्याधुनिक संचारसेवाही उत्तम त-हेने कार्यरत केल्या गेल्या आहेत.
एसटीडी, आयएसडी, तालुका अंतर्गत डायरेक्ट डायलिंग, ग्रुप डायलिंग, होम कंट्नी सुविधा, डायनॅमिक एसटीडी लॅकिंग सुविधा, कॉल वेटिंग, वॅकअप अलार्म, व्हासासी कार्डस, तत्काल राकड हस्तांतरण, याशिवाय दोषनिवारण, स्थानिक व मध्यवर्ती निदेशिका, दूरध्वनी क्रमांकात होणा-या बदलाची माहिती, मिटर रिडिंग, ट्न्ंककॉल बुकिंग, बिल भरण्यासाठी ग्राहक केंद्र अशा संगणकीकृत सेवाही उपलब्ध आहेत. यांच्या वापरामुळे ग्राहकांच्या अनेक अडचणींचे निराकरण होण्यास मदत झाली.
ग्राहकांच्या सोयीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी टेलिफोन अदालत, ओपन हाऊस सेशन आयोजित केली जातात. दर महिन्याच्या ५ तारखेस पत्रकार परिषद आयोजित करून सांगली दूरसंचारच्या नवनवीन योजना आणि उपक्रमांची माहिती देऊन ती अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविली जाते. ८०० रू.भरून दूरध्वनी या सवलतीच्या योजनेस तर जिल्हात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
सांगली दूरसंचारने केवळ संख्यात्मक प्रगतीच केली आहे असे नाही तर सांस्कृतिक जाणीवही जोपासली आहे. वार्षिक गणेशोत्सव, वरिष्ठ अधिका-यांकडून दिली जाणारी उदबोधक व्यांख्याने, जनसंपर्काचे विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. संवादिनी ही सांगली दूरसंचारची गृहपत्रिका दरवर्षी प्रकाशित केली जाते. आपल्या कर्मचा-यांचे आरोग्य उत्तम रहावे तसेच ते तणावमुत्क रहावेत म्हणून योगासन शिबिरे, विविध नामवंत डॉक्टरांची व्याख्याने आयोजित केली जातात. हिंदी पखवाडा, कौमी एकता सप्ताह, दूरसंचार दिवस, महिला दिवस, पर्यावरण दिवस, यासारखे कार्याक्रम आयोजित करून कर्मचा-यांच्या कलागुणांना, बुद्धिचातुर्याला वाव दिला जातो.
आज माणसाला संदेशवहनाबरोबर क्षणोक्षणी बदलत जाणा-या व्यापार, उद्योग, संशोधन, विज्ञान, मार्केटिंग, वैद्यकीय सेवा, नैसर्गिक बदलत जाणा-या व्यापार, उद्योग, संशोधन, विज्ञान, मार्केटिंग, सुधारित वैद्यकीय सेवा, विस्तारत असलेल्या शैक्षणिक कक्षा, नैसर्गिक बदल, पर्यावरण, स्वरंक्षण, देहसंरक्षण अशा जीवनाशी निगडित प्रत्येक घटकाची माहिती तत्काळ होणे आवश्यक झाले आहे आणि त्यासाठी दूरसंचार सेवेइतकी कोणतीच महत्वपूर्ण सेवानाही ऑप्टिकल फायबरमुळे संदेश वहनात क्रांतीच घडली असुन स्वत:ची मोबाईल सेवा सुरू करणे हे आमचे उदिष्ट आहे व ते लवकरच प्राप्त होईल यात शंका नाही. खाजगी दूरसंचार सेवा अनेक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून आमिष दाखवतील पण देशाच्या कानाकोप-यात पसरलेल्या नेटवर्कमुळे ग्रामीण विभागातही ग्राहकांची सेवा तितक्याच तत्परतेने आम्ही करतो आहोत. ग्राहकांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले हा आमचा सन्मान आहे. आणि आमचा तत्पर कर्मचारी वर्ग, प्रोत्साहन देणारा अधिकारी वर्ग आणि कुशल तंत्रज्ञ यांचा मोलाचा वाटा आहे.