मुख्य विभाग

स्वागतकक्ष साहित्य लेख जुळेवाडी या खेडेगावाची पहिली मराठी वेबसाईट
जुळेवाडी या खेडेगावाची पहिली मराठी वेबसाईट पीडीएफ प्रिंट ई-मेल
ज्ञानदीपने गेल्या १५ वर्षांच्या काळात  सांगली (www.mysangli.com) व कोल्हापूर (www.mykolhapur.net)  या शहरांच्या मराठी माध्यमातील वेबसाईट करून महाराष्ट्रात मराठी वेबसाईट करण्यात पुढाकार घेतला आहे. आता तासगाव तालुक्यातील जुळेवाडी या छोट्याश्या खेड्याची वेबसाईट (www.julewadi.com) तयार करण्याची संधी जुळेवाडी ग्रामपंचायतीने ज्ञानदीप इन्फोटेकला दिली याबद्दल जुळेवाडी ग्रामपंचायतीस धन्यवाद् !

जुळेवाडीने आपली वेबसाईट करून स्मार्ट व्हिलेजच्या वाटचालीत आपले पहिले पाऊल टाकले आहे. ज्ञानदीपने ही वेबसाईट तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा (Responsive Design ) वापर केला आहे. त्यामुळे ही वेबसाईट कॉम्प्युटरप्रमाणे मोबाईलवरही व्यवस्थित पाहता येते.

पुढारी दैनिकात याविषयी आलेल्या बातमीचे कात्रण खाली दिले आहे.
आपण ही वेबसाईट आवर्जून पहावी व आपले अभिप्राय ज्ञानदीपकडे( हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठी जावास्क्रिप्ट सक्रिय करा. ) पाठवावेत ही विनंती.
स्मार्ट व्हिलेज या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये निवड होण्यासाठी गावाची वेबसाईट असणे उपयुक्त ठरणार आहे. इतर ही ग्रामपंचायतीनी जुळेवाडीचा आदर्श घेऊन आपल्या गावाची वेबसाईट करावी. या कार्यात ज्ञानदीप आपले सर्व सहकार्य देईल.