सांगलीतील प्रसिध्द दुकाने
( नमुन्यादाखल काही प्रसिध्द परंपरागत दुकानांची माहिती दिलेली आहे. त्यांत वेळोवेळी नवीन माहिती घालण्यात येइल.)
गोगटे बंधू -
         सन १९४१ मध्ये श्री. अनंत गोगटे यांनी सांगलीत घडाळयाचे दुकान सुरू केले. १९४७ च्या जाळपोळीत नुकसान होऊनही पुन्हा जोमाने सुरुवात करून व्यवसायाचा व्याप वाढविला. त्यांची मुले कै. श्री. सुरेश गोगटे यांनी घड्याळयाचे, श्री. अरूण गोगटे यानी टीव्ही फ्रीज आणि श्री. चंद्रशेखर गोगटे यांनी चष्मा अशी तीन स्वतंत्र दुकाने सुरू केली. घडाळयाचे दुकान आता कै. श्री. सुरेश गोगटे यांचे चिरंजीव श्री, विवेक गोगटे चालवितात. याशिवाय श्री. अरूण गोगटे यांनी टीव्ही दुकानाच्या तीन नव्या शाखा माळी थिएटरनजिक, मिरज व तासगाव येथे सुरू केले असून खेळाच्या सामानाचे दुकानही काढले आहे.
दांडेकर बंधू -
   दांडेकरांच्या किराणा दुकानाची सुरुवात १० जुलै १९७१ ला झाली व तेव्हापासून त्यात उत्तरोत्तर प्रगती चालू आहे. श्री अरूण व श्री दांडेकर दुकान व्यवसाय सांभाळतात तर त्यांच्या आई व पत्नी घरात माल उत्पादन व्यवस्था पहातात. किराणा दुकानापासून सुरुवात जालेला हा व्यवसाय आता किराणा, फूड र्फॅन्सी, फेर्नचर दुकाने असा वाढला आहे. श्री. अरुण दांडेकर यांचा अनेक सामाजिक संस्थांशी संबंध असून रोटरी क्लब, रिमांड होम, स्त्री शिक्षण संस्था, ब्राह्मण नागरी पतसंस्था, विश्व जागृती मंडळ इत्यादी संस्थांच्या जडणघडणीत त्यांचा महत्वाचा सहभाग आहे.

 

 
*ज्ञानदीप - मराठी वेबसाईट
 
      आतापर्यंत १०० वेबसाईट विकसित