प्रज्ञा प्रबोधिनी गुरुवर्य वा. द. नामजोशी
निवृृत्त संयोजक आणि मुख्याध्यापक
प्रज्ञा प्रबोधिनी, सावरकर प्रतिष्ठान विश्रामबाग, सांगली.
    बालवाडी ते IAS. अखेर दर्जेदार शिक्षण व मौलिक संस्कार यासाठी, महाराष्ट्नतील पहिली अभिनव सेवाभावी शिक्षणसंस्था
महाराष्ट्नीय विद्यार्थी राष्ट्नीय स्तराच्या स्पर्धा परीक्षात मागे पडतात, ही अनेक वर्षांची खंत होती. ती दूर करायची या इराद्याने, सांगली शिक्षण संस्थेच्या सलग साडेअडतीस वर्षांच्या प्रदीर्घ यशस्वी सेवेनंतर, निवृत्त झाल्यावर वयाच्या ६४ व्या वर्षी एक धाडसी पाऊल टाकले.
निवृत्तीनंतर ५-६ वर्षे एन्. टी. एस्., आय्. आय्. टी. प्रवेश परीक्षा, एन्. डी. ए. प्रवेश परीक्षा व आय्. आय्. एस्. या चार राष्ट्नीय स्तरांच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, त्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, या परीक्षा उत्तीर्ण झालेले माझे काही विद्यार्थी व या परीक्षांना मार्गदर्शन करणारे अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक, यांच्याशी संपर्क साधून, प्रथम एन्. टी. एस्. शिष्यवृत्ती परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी नियोजन केले. आणि जून १९८१ पासून प्रति रविवारी, दीपावलीची सुट्टी व मे महिन्याची सुट्टी, यांचा उपयोग करून सेवाभावी, तज्ज्ञ व कर्तव्यदक्ष प्राध्यापक व शिक्षक यांच्या सहकार्याने इ. ८वी, इ. ९वी, व इ. १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी तीन स्वतंत्र छोटे वर्ग, सकाळी ७ ते १२ स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनासाठी सुरू केले. सुरूवातीस माझ्या काही शिक्षक मित्रांनी विचारले की `सर तुम्हाला प्रज्ञा शोध लागला का? ` मी त्यांना शांतपणे उत्तर देत असे, `आत्ता कुठे सप्टेंबर महिना आहे. राष्ट`ीय प्रज्ञाशोध परीक्षा मे महिन्यात दुसर्‍या रविवारी असते आणित्या परीक्षांच्या लेखी कसोटींच्या गुणवत्तेवर जुलैअखेर मुलाखतींसाठी निवड करतात व अंतिम निर्णय ऑक्टोबरमध्ये कळतो.`
पण पहिल्याच वर्षी आमच्या पाच विद्यार्थ्यांची राष्ट्नीय पातळीवर मुलाखतीसाठी निवड झाली. व पुढे मुलाखतीनंतर त्यातील दोन विद्यार्थ्यांना एन्. टी. एस्. शिष्यवृत्ती मिळाली.
आपल्याकडे हुषार विद्यार्थी आहेत. त्यांना केवळ एस्. एस्. सी. बोर्डाच्या चाकोरीबद्ध अभ्यासक्रमात गुंतवून न ठेवता त्यांच्या बुद्धीला अधिक खुराक देण्याची व्यवस्था शिक्षण संस्थांनी केल्यास, त्यांची बुद्धी वाया घालविण्याचे पाप, शिक्षकांच्या माथी येणार नाही. दर्जेदार शिक्षण व मौलिक संस्कार हा मानवी जीवनाचा खरा आधार आहे. इयत्ता १० वी साठी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्नीय प्रज्ञा शोध परीक्षेत प्रज्ञा प्रबोधिनीच्या अनेक विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद यश मिळविले.
या राष्ट्नीय स्तरांच्या स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मार्गदर्शन चालू असताना, विश्रामबाग परिसरातील नागरिकांची गरज म्हणून
१९८४ मध्ये (अ) आदर्श शिशु विहार (बालवाडी)
१९८६ मध्ये (ब) अभिनव बालक मंदिर (प्राथमिक शाळा)
१९९१ मध्ये (क) प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला (माध्यमिक शाळा)
सुरू होऊन, त्यांना शासकीय मबान्यता व आता अनुदानही सुरू झाले आहे. सध्या या शिक्षण संस्थांत १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सर्व सहकारी शिक्षकांचे हार्दिक सहकार्य व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, विश्रामबाग, सांगलीच्या संचालकांनी या उपक्र मास जागा दिल्यामुळे या ` प्रज्ञा प्रबोधिनी ` च्या कार्याचा शुभारंभ करता आला व पुढे उत्तरोत्तर सर्वच स्पर्धा परीक्षात सुयशाची उज्वल परंपरा निर्माण झाली आणि जून १९९४ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी या संस्थेतून मी सेवानिवृत्त झालो. पुनश्च सर्वांना हार्दिक धन्यवाद !
अशा तऱ्हेने काम करणारी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक तरी ` प्रज्ञा प्रबोधिनी ` व्हावी हीच तीव्र इच्छा !

 

 
*ज्ञानदीप - मराठी वेबसाईट
 
      आतापर्यंत १०० वेबसाईट विकसित