गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म १३ नोव्हंेबर १८५५ रोजी झाला. देवलांनी दुर्गा, मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शारदा, संशयकल्लोळ इत्यादी नाटके लिहिली.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी केसरी व लोकमान्य वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केले. कृष्णाजी खाडिलकर यांनी कांचनगडची मोहना, कीचकवध, मानापमान, भाऊबंदकी, द्रौपदी ही नाटके त्यांनी लिहिली.
संत कोटणीस महाराज
(१८६४-१९२४)
संत कोटणीस महाराज हे सुमारे २५ वर्षे दररोज दोन तास कीर्तन करीत असत. त्यांनी कीर्तन करण्यासाठी कधीही पैसे घेतले नाहीत. त्यांची ही कीर्तन करण्याची परंपरा आजही त्यांच्या पुत्रपौत्रांनी चालूच ठेवली आहे.