* व्यक्तिपरिचय *
 
धन्वंतरी आबासाहेब सांबारे  
      आबासाहेब सांबारे हे नामांकित वैद्य होते. ते विविध वनस्पतींचे काढे करुन व अर्क करुन औषधे बनवीत असत. त्यांनी औषधाचे पैसे कधीही घेतले नाहीत. त्यांनी कायमस्वरुपी तेरा फुटी लाकडी गणपती तयार करुन गणपती उत्सव सुरु केला.
राजकवी साधुदास  
    यांचे मूळ नाव गोपाळ धोंडो पाटणकर. त्यांचे वडील ब्रिटिश राज्यात मोजणीदार होते त्यामुळे त्यांना मुजुमदार असं नाव पडले. त्यामुळे साधुदासांनी मुजुमदार हेच नाव कायम ठेवले. साधुदास हे चुलत चुलत्यांना दत्तक गेल्यानंतर त्यांचे नाव गोपाळ गोविंद मुजुमदार असे झाले. त्यांनी रघुवंशावर आधारित वनविहार, रणविहार व गृहविहार या तीन विभागात महाकाव्याची रचना केली. ते शीघ्रकवी होते. गो.गो.मुजुमदार या नावाने कादंबरीचे लेखन साधुदासांनी केले. तसेच पोर्णिमा, मराठेशाहीची वद्यपक्षप्रतिपदा, राजसेवा यासारखी अनेक नाटके (कादंबर्‍या ) लिहिल्या.
उद्योगरत्न दादासाहेब वेलणकर
(१८८७-१९७८)
श्री गजानन वीव्हींग मिलची स्थापना व नामकरण केले. १९ जानेवारी १९४७ मध्ये दादासाहेबांची सुवर्णातुला थाटामाटात पार पडली होती. गांधी हत्येनंतरच्या काळातील मिलची राखरांगोळी झाली तरी चिकाटीने पुन्हा मिलची उभारणी केली. जगात वागावे कसे, मी कारखानदार कसा झालो यासारखी १४ पुस्तके लिहिली.

 
*ज्ञानदीप - मराठी वेबसाईट
 
      आतापर्यंत १०० वेबसाईट विकसित