* व्यक्तिपरिचय *
 
संगीततज्ञ प्रो. ग. ह. रानडे
(१८९७-१९६६)
         ते शास्त्रीय संगीताचे चांगले अभ्यासक होते. श्री रानडे यांनी    Hindusthani Music-Its Physics and Aesthetics, Music of Maharashtra, Encyclopedia of Indian Music ही पुस्तके लिहिली.  
कवी काव्यविहारी
(१८६४-१९२४)
     त्यांचे मुळ नांव धोंडो वासुदेव गद्रे हे आहे. त्यांचा स्फूर्तिलहरी हा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. त्यांनी चार काव्यसंग्रह व तीन गद्य पुस्तके लिहिली आहेत.
भालचंद्र म्हैसकर
 यांचा जन्म - १९०८ रोजी झाला. प्रख्यात बुद्धिबळपटू श्री. भालचंद्र म्हैसकर यांना कै. रानडे चेस टूर्नामेंट, मुंबई, अहमदाबाद, रशिया, येथील स्पर्धांमध्ये यश मिळाले. त्यांनी ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला होता

कै. हरी नाना पवार
(१९०५-१९९६)
  कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची नदीकाठी केशवनाथ मंदिराच्या परिसरात तालिम आहे. ज्योतिरामदादा सावर्डेकर यासारखे भारतभीम म्हणून नावलौकिक मिळवलेले पैलवान त्यांच्या शिष्यगणात होते.त्यांनी इतरांना मल्लविद्येचे शिक्षण दिले. आमदार संभाजी पवार हे त्यांचेच सुपुत्र.
 
*ज्ञानदीप - मराठी वेबसाईट
 
      आतापर्यंत १०० वेबसाईट विकसित