* व्यक्तिपरिचय *  
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. स. खांडेकर (१८९८-१९७६)
हे प्रसिद्ध साहित्यिक होते. तसेच ते महान लेखक व प्रख्यात कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे १८९८ ते १९१४ पर्यंत सांगलीत वास्तव्य होते.
नटवर्य मामा पेंडसे (१९०६-१९९१)
भाऊबंदकी या नाटकातील नाना फडणीसांची भूमिका अजरामर झाली आहे. 'दुरितांचे तिमिर जावो' मधील खलनायक पंतांची भूमिका गाजली. त्यांनी अनेक नाटकांत भूमिका केल्या.

मा. अविनाश (श्री गणपतराव मोहिते)
जन्म - १९०९
त्यांनी भक्तप्रल्हाद, भक्तध्रुव, शाकुंतल, सन्यस्त खड्गमध्ये नलिनीचे काम केले. तसेच त्यांनी मानापमान,ब्रह्मकुमारी या नाटकात स्त्रीभूमिका केली. भक्त पुंडलिक, पायाची दासी, घरजावई, भरतभेट, कुलवधू या नाटकात त्यांना चांगले यश मिळाले. माझे घर, राणीचा बाग, तुझं माझं जमेना इत्यादी नाटकात त्यांनी भूमिका केल्या. x
दानशूर राजमतीबाई पाटील (१९१४-२००१)
         यांचा जन्म १७ मे १९१४ रोजी सांगलीजवळील समडोळी येथे झाला. यांनी जैन महिलांच्या शिक्षणासाठी बरेच प्रयत्न केले. जैन महिलाश्रम चालू केले. त्यांनी मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम केले आहे. नेमगोंडा पाटील व राजमतीबाई यांनी आपली सर्व मालमत्ता लठ्ठे पॉलिटेक्निकला दान म्हणून देऊन टाकली. त्यांचा श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट आहे. त्यांना 'सांगलीभूषण' किताब मिळाला.

 
*ज्ञानदीप - मराठी वेबसाईट
 
      आतापर्यंत १०० वेबसाईट विकसित