* व्यक्तिपरिचय *
किकेटपटू विजय हजारे  

    ते प्रथम श्रेणीचे बॅटस्मन होते. १९३९-१९४० मध्ये महाराष्ट्नस रणजी करंडक मिळवून दिला. रणजी करंडकमध्ये एकूण ६३१२ धावा काढल्या. यात २२ शतके ८ वेळा शितके आहेत. यांनी एकूण ५७ शतके, ६६ अर्धशतके केली. यानी पद्मश्री किताब पटकविला.
बापूसाहेब पुजारी
   सांगली अर्बन बँकेच्या नुकत्याच झालेल्यानिवडणूकीत आपल्या गटाच्या सर्वच्या सर्वउमेदवारांना विजय मिळवून देणारे श्री. बापूसाहेब पुजारी हे सांगलीकरांना सुपरिचित आहेतच. वयाच्या ७५ व्या वर्षी सुध्दा असलेला त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. बुध्दिमान, कल्पकता आणि संघटनकाशय या जोरावर बापूसाहेबांनी अलौकिक कामगिरी करून दाखविली आहे. ३४ वर्षे यंानी पत्रकारितेचा व्यवसाय केला. दै.तरूणभारतचे दक्षिण महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. यामुळे राजकीय क्षेत्रातील फार मोठा अनुभव गाठीशी बांधता आला. अन्याय व भष्ट्राचाराविरूध्द लेखन केले. जिल्हा वार्तालाप हे सदर प्रथम सुरू करण्याचा मान त्यांना मिळाला. पत्रकारितेबरोबरच सहकारी चळवळींचे महत्व पटविल्याने या क्षेत्रातही अभ्यासपूर्ण कार्य केले. सांगली जिल्हा अर्बन बॅंक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन बॅंक फेडरेशनचे संचालक व अध्यक्ष, तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बॅंक अँड क्रेडिट सोसा., नवी दिल्ली, या संस्थेचे संचालक अशा महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले. सहकार भारती या संघटनेचे कार्याध्यक्ष झाल्यामुळे ते ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचू शकले व या अडचणी सोडवू शकले.
एक राज्यात नागरी सहकारी बँकेची एक शिखर बँक असावी यासाठी त्यांनी अटोकाट प्रयत्न केले. यासाठी मोठे अधिवेशन घेऊन एक शिखर बँकेचा प्रभावीपणे मांडला. परिणामत: रिझर्व बँकेकडून 'अपेक्स बॅंक ' असे तिला प्रमाणपत्रही मिळविले. मधुकर देवल यांनी म्हैसाळ येथे सरू केले. तेथे गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाते. अशा लोकांना स्वत:चा व्यवसाय निर्माण करून देणे, सरकारी कचेर्‍या , बँका यातील व्यवहार करण्यास शिकविणे या उद्देशाने ट्रस्ट स्थापन केला. बापूसाहेब सुरूवातीपासून या कामात सहभागी आहेत. तसेच गेली १०-१५ वर्षे याचे अध्यक्षही आहेत. बापूसाहेबं यांना पत्रकारिता, सहकारी चळवळीची आवड आहे. या प्रेरणेमुळे सांगलीत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ज्ञानेश्वरी पारायणे घडवून आणली जातात.
भाऊसाहेब पडसलगीकर
सांगलीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहोचविणारे भाऊसाहेब पडसलगीकर आणि बुद्धिबळ हे जणू एक समीकरणच बनून गेले आहे. भाऊसाहेबांनी बुद्धिबळाच्या क्षेत्रात गेल्या ७५ वर्षांच्या कालखंडात आपल्या लक्षणीय कामगिरीने जागतिक कीर्ती संपादन केली. स्वत:पुरती बक्षिसे मिळवून ते थांबले नाहीत. सांगलीतील आबालवृद्धांना, महिलांना सुद्धा प्रशिक्षित करण्याचे अवघड काम त्यांनी स्वखुशीने स्वीकारले. त्यांनी प्रशिक्षित केलेल्या बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही नाव मिळविले.
सांगलीतील नूतन बुद्धिबळ मंडळातर्फे निरनिराळया स्तरावरील स्पर्धा भरविल्या. ८,१०,१२,१४,१६,१९ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी, केवळ महिलांसाठी व सर्वांसाठी आंतरराष्ट्रीय खुल्या अशा वेगवेगळया ९ स्पर्धा घेतल्या जातात. त्याचे सर्व श्रेय भाऊसाहेबांकडेच जाते. आज सुद्धा भारतात सांगलीशिवाय अशा स्पर्धा कोठेही घेतल्या जात नाहीत. असा बुद्धिबळमहोत्सव दर मे महिन्यात सांगलीत भरविला जातो त्याला ३२ वर्षे झाली. भाऊसाहेबांच्या अविरत कष्टांचेच हे फळ होय.
महाराष्ट्नत चेस असोसिएशनची स्थापना करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यासाठी भाऊसाहेब स्वत: गावोगावी गेले. तेथे बुद्धिबळमंडळे स्थापन करून ती कार्यरत केली व या खेळाचे जाळे सर्वत्र पोहोचविले.
भाऊसाहेबांना मिळालेले सन्माननीय पुरस्कार -
१. फाय फाउंडेशन इचलकरंजी (१९९१)
२. शिवछत्रपती क्रीडा कार्यकर्ता (महाराष्ट्र शासनातर्फे १९९१)
३. दादोजी कोंडदेव पुरस्कार (महाराष्ट्र शासनातर्फे १९९७)
अत्यंत शिस्तप्रिय, निर्व्यसनी, कुशल संघटक व प्रशिक्षक असणारे भाऊसाहेब पडसलगीकर हे सांगलीचे एक मोलाचे भूषण होय.
दीपक लेले
विश्व विक्रमाची नोंद - सांगलीचे दीपक लेले यांनी २५ सप्टेंबर १९८४ मध्ये न्यूयार्क ते लॉस एंजिल्स हे अंतर एकचाकीवरून पार करून विश्व विक्रम नोंदवला होता. त्याआधी त्यांनी १९८२ मध्ये सांगली ते नवी दिल्ली असे अंतर ’एक चाकी ’ वरूनच पार केले होते. गिनिज बुकात त्यांच्या विक्रमाची नोंद झाली आहे.मोहिते सायकलवाले, नाना ओतारी आणि रेनबो सायकल मार्टचे सूर्यकांत कुलकर्णी यांनी लेले यांना एक चाकी बनवण्यास मदत केली होती. त्याआदी सरावासाठी त्यांनी देवल सर्कसमधील एकचाकी सायकलचा उपयोग केलेला होता.
बापूसाहेब करमरकर, मिरज

डॉ. गोविंद चिंतामण तथा बापूसाहेब करमरकर
`चिंतामणी ' निवास, शाळा नं.१ जवळ,
ब्राम्हणपुरी, मिरज - ४१६ ४१०.
फोन : (०२३३) २२९५८७.

जन्म मिरज येथे दिनांक २३-१२-१९३२ रोजी.
लहानपणापासून घरात संगीतमय वातावरण. त्यामुळे संगिताची आवड. किशोरवयात पुरलेला, टांगता, वेताचा, दोरीचा, उसावरील, हत्यारी, बारा बाटल्यावरील निराधार मल्लखांबात पारंगत. मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई, बडोदा, नागपूर, लखनौ, रत्नागिरी वगैरे ठिकाणांच्या सामन्यातून पहिला नंबर. अखिल महाराष्ट्र शारिरीक शिक्षण परिषदेच्या सामन्यातून सलग तीन वर्षे पहिला क्रमांक. विलींग्डन कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेजिएट स्पोर्टसमध्ये दोन्ही वर्षे मल्लखांबात चँपीयन. महाराष्ट्नचे माजी राज्यपाल हरेकृष्ण मेहता, न. वि. गाडगीळ, सी. डी. देशमुख, डॉ. राधाकृष्णन्, विनोबा भावे यांचेसमोर प्रात्यक्षिके. त्याचप्रमाणे महाराष्ट्नीय मंडख पुणे, इंदौर, लखनौ, भोपाळ, चंदीगड येथे मल्लखांब प्रात्यक्षिके. तसेच दिल्ली येथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांचेसमोर राष्ट्न्पती भवनात श्री. अंबाबाई तालीम संस्थेच्या दौर्‍या चे माध्यमातून मल्लखांबाची प्रात्यक्षिके व त्याबद्दल वाहव्वा.
सातारचे पं. केशवबुवा मटंगे (इंदिराबाई खाडिलकर यांचे गुरू) यांचा २-३ वर्षे सहवास. ग्वाल्हेर घराण्याचे गाईकीतील प्रचलीत रागांचे ख्याल, चिजा, कांही तराणे यांची तोंड ओळख. मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये दोन वर्षे एन्ट्न्नशिप, मिरज व आसपासच्या भागात वैद्यकीय व्यवसाय.
मिरजेतील पं. पेटकरबुवा यांचेकडून ३-४ वर्षे गायनास मार्गदर्शन. पं. भानुदासबुवा गुरव यांचेकडून लय, ताल, कांही ठेके, कायदे यांची माहिती. पं. भानुदासबुवा स्मृति महोत्सव समितीचे अध्यक्षपदाची जबाबदारी. गेली १०-१२ वर्षे मिरजेतील श्री. अंबाबाई संगीत नवरात्रोत्सवाचे मंडळाचे अध्यक्षपद, उस्ताद गणपतराव कवठेकर यांचे स्मृति सोहळा समितीचे उपाध्यक्षपद तसेच खाँ अब्दुल करीम खाँ स्मारक भवन, ऊमरसाहेब सतारमेकर, आबासाहेब सतारमेकर स्मृति सोहळा इत्यादी संगीत कार्यक्रमास सहकार्य. या सहभागामुळे संगीत क्षेत्रातील कलाकारांचा व येथे काम करणार्‍या लोकांचा सहवास. श्री. अंबाबाई तालीम संस्थेच्या सल्लागार समितीवर नियुक्ती.

 
*ज्ञानदीप - मराठी वेबसाईट
 
      आतापर्यंत १०० वेबसाईट विकसित